ग्रुप ग्रामपंचायत बोरांडा
२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गट ग्रामपंचायत बोरांडा–शिळ–बांगरचोळे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर येथे सुमारे ६०० कुटुंबे वास्तव्यास आहेत. एकूण ३०२९ लोकसंख्येपैकी १५१७ पुरुष व १५१२ महिला आहेत. या भागात प्रामुख्याने आदिवासी व कुणबी समाजातील लोक राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून ते भात, नाचणी यांसारख्या पिकांची लागवड करतात. आदिवासी समाजातील लोक शेतमजूर, वीटभट्टीमजूर व इतर मजुरीची कामे करून आपला उदरनिर्वाह करतात. तसेच ते काही प्रमाणात कुक्कुटपालन व बकरीपालनही करतात.
पावसाळ्याच्या हंगामात, विशेषतः श्रावण महिन्यात गणपती उत्सवाच्या अगोदर, ढगांचा गडगडाट व विजांच्या कडकडाटासह पडणाऱ्या पावसाच्या सरींमध्ये या परिसरातील रानात “अळंबी” ही नैसर्गिक भाजी उगवते. ही भाजी अत्यंत चवदार व पौष्टिक मानली जाते. मात्र ती उगवल्यानंतर लगेचच काढावी लागते, अन्यथा ती फुलून खाण्यास अयोग्य होते.
पहाटे लवकर उठून आदिवासी बांधव अळंबी शोधून फुलण्यापूर्वीच ती खुडून घेतात, स्वच्छ करून ताजीच बाजारात विक्रीसाठी नेतात. पावसाळ्यात हा अल्पकालीन व्यवसाय त्यांच्यासाठी महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन ठरतो व त्यांच्या आर्थिक गरजा भागविण्यास मदत करतो.
लोकसंख्येची माहिती
| क्रमांक | क्षेत्र | तपशील |
|---|---|---|
१ | एकूण लोकसंख्या | ३१९९ |
२ | पुरुष लोकसंख्या | १५८४ |
३ | महिला लोकसंख्या | १६१५ |
४ | ०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या | ५८० |
५ | अनुसूचित जाती (SC %) | ०.६% |
६ | अनुसूचित जमाती (ST %) | ७८.७ % |
उपलब्ध पायाभूत सुविधा
| क्रमांक | सुविधा प्रकार | उपलब्ध (होय/नाही) | संख्या | रस्त्याने जोडलेले (होय/नाही) |
|---|---|---|---|---|
| १ | ग्रामपंचायत कार्यालय | |||
| २ | प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC) | |||
| ३ | उपकेंद्र (Sub Center) |
| ||
| ४ | अंगणवाडी |
| ||
| ५ | प्राथमिक शाळा | |||
| ६ | माध्यमिक शाळा | |||
| ७ | उच्च माध्यमिक शाळा | |||
| ८ | महाविद्यालय / व्यावसायिक केंद्र | |||
| ९ | समुदाय भवन (Community Hall) | |||
| १० | स्वस्त दर दुकान (PDS) | |||
| ११ | श्मशानभूमी / स्मशानभूमी | |||
| १२ | इंटरनेट / मोबाईल टॉवर | |||
| १३ | सीएससी केंद्र (CSC Center) |
प्रशासकीय संरचना
