ग्रुप ग्रामपंचायत बोरांडा 

   गट ग्रामपंचायत बोरांडा–शिळ–बांगरचोळे, तालुका विक्रमगड, जिल्हा पालघर ही प्रामुख्याने आदिवासी व ग्रामीण लोकवस्ती असलेली ग्रामपंचायत आहे. या परिसरात पारंपरिक आदिवासी संस्कृती, रीतिरिवाज व सण-उत्सव आजही जपले जातात. गावातील देवस्थाने, समाजमंदिरे व विविध सामुदायिक कार्यक्रम हे ग्रामस्थांच्या सामाजिक व धार्मिक जीवनाचे महत्त्वाचे केंद्र आहेत.
सन २०११ च्या जनगणनेनुसार या गट ग्रामपंचायतीत सुमारे ६०० कुटुंबे वास्तव्यास असून एकूण लोकसंख्या अंदाजे ३०२९ आहे. यामध्ये १५१७ पुरुष व १५१२ महिला आहेत. या भागात प्रामुख्याने आदिवासी व कुणबी समाजातील लोक राहतात. कुणबी समाज शेती हा मुख्य व्यवसाय म्हणून करतो, तर आदिवासी समाजातील लोक शेतमजुरी, वीटभट्टीमजुरी तसेच इतर मजुरीची कामे करून उपजीविका करतात. याशिवाय काही प्रमाणात कुक्कुटपालन व बकरीपालन देखील केले जाते.
ग्रामपंचायतीच्या हद्दीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्रे, समाजमंदिरे तसेच आरोग्य सेवा देणारे उपकेंद्र यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध आहेत. तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सार्वजनिक विहिरी, शेततळी व इतर सामाजिक सुविधा ग्रामस्थांच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
पावसाळ्यात, विशेषतः श्रावण महिन्यात, या परिसरात “अळंबी” ही नैसर्गिक भाजी मोठ्या प्रमाणावर उगवते. आदिवासी बांधव पहाटे लवकर उठून ही भाजी फुलण्यापूर्वीच गोळा करतात व स्वच्छ करून बाजारात विक्रीसाठी नेतात. हा अल्पकालीन व्यवसाय पावसाळ्यात त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवून देतो.
ग्रामपंचायत स्थानिक विकास, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यासाठी सातत्याने कार्यरत असून गावांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे.
 
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

WhatsApp Image 2026-03-05 at 1.24.23 PM (1)

श्रीम. सुमेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

rajendra patil

श्री. राजेंद्र पाटील

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image (72)

श्री. महेश मधुकर पांढरे

गट विकास अधिकारी
पंचायत समिती विक्रमगड

WhatsApp Image 2026-03-27 at 2.39.43 PM

सौ. सुनंदा गंगाराम पाटील

सरपंच
ग्रुप ग्रामपंचायत बोरांडा

WhatsApp Image 2026-03-27 at 2.29.27 PM

श्री. जगन्नाथ शांताराम पाडेकर

उपसरपंच
ग्रुप ग्रामपंचायत बोरांडा

WhatsApp Image 2026-03-27 at 2.29.12 PM

श्री. संदेश दळवी

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रुप ग्रामपंचायत बोरांडा

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना